रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- शासनाचा विकास किती कपटी असतो, जे विरोध करू शकतात त्यांना सर्व सुख सुविधा न मागता मिळते आणि जे गरीब अशिक्षित आदिवासी पारधी कुठलाही विरोध करू शकत नाही त्यांना नरकयातना भोगायला सोडून देण्यात येते. किती विरोधाभास असते एका शहरातील दोन परिसराचा अशाच प्रकार जालना जिल्हातील परतूर शहरात दिसून येत आहे.
परतूर शहरात उद्योग, शिक्षणाने, रेल्वे रूटने, उपविभागीय कार्यालय, स्वच्छता व पाणीपुरवठा माजी मंत्र्याचा मतदार संघ गेल्या दहा ते वीस वर्षापासून काँग्रेसच्या हातामध्ये आहे. येथील नगर पंचायत पालिका प्रशासन या सर्व गोष्टी पाहता परतुर मधील सर्वच वॉर्ड एकदम स्वच्छ आणि सुंदर रस्ते, नाल्या, अंडरग्राउंड गटारे या सर्व गोष्टींनी ए-वन आहे. परंतु परतुर येथे वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी समाज त्यांचा वार्ड त्यांची गल्ली जशी काही परतूर शहराला एक लागलेला रोगच समजावा कारण येथील प्रशासनाने येथील आमदाराने येथील खासदारांनी येथील नगरपरिषद प्रशासनाने सर्वच वार्डांचा विकास केलेला आहे. परंतु ज्या वेळेस आदिवासी समाजाची वेळ येते त्यावेळेस यांना जाणून-बुजून आणि मुद्दामून या लोकांच्या या वार्डाचा विकास करावा का वाटत नाही?
मोहन कुमार अग्रवाल यांनी नुकतेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेने मध्ये जालना जिल्हाध्यक्ष या पदावर आहेत. त्यांनी सुद्धा करोडोचा फंड आणला असून इतर सर्व वॉर्डात जेथे रस्ते नाहीत तिथे रस्ते, जिथे लाईट नाही तिथे लाईट, जिथे गटारी नाही तेथे गटारे करून विकास केला परंतु त्यांना सुद्धा या समाजाच्या समस्या दिसत नाही का? असा प्रश्न सर्व स्तरातून विचारल्या जात आहे.
आता येणाऱ्या आगामी निवडणुकीत या समाजाचा मतांचा उपयोग करून घेण्यासाठी येथील राजकारणी लोक कोणता नवा डाव आखतील त्याबद्दल कोणालाही माहीत नाही. परंतु येथील राहत असणाऱ्या आदिवासी पारधी समाजाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये सर्व समाज हा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे असे आमच्या प्रतिनिधीशी स्थानिक नागरिकांनी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली.
पारधी वाड्याचा रस्त्याचा व त्यांच्या विकासाचा फंड स्थानिक नगर परिषद प्रशासन यांनी इतर वार्डाच्या विकासासाठी वापरला आहे. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सर्व येथील मतदारांना जागृती करून येथील राज्यकर्त्यांना त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ. ॲड. सुरेश काळे (सचिव वकील संघ परतुर व सल्लागार परतुर पत्रकार संघ)
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…