पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट २. पुणे शहर
पुणे . दिनांक १९/०९/२०२२
दोन महिन्यात सराईत गुन्हेगारांकडुन एकुण १३ अग्नीशस्त्रे जप्त.पुणे शहरात मोठया प्रमाणावर अग्निशस्त्र दाखवुन लुटमारीचे प्रकारात बाद झाली असुन सदर गुन्हयांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे युनिट-२ कडोल प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली टिम तयार करण्यात आलेली होती त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक, विशाल मोहिते, पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे, असे युनिट-२ हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना सेंट्रल स्ट्रीट चौकीजवळ आले असता स्टाफमधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशनकडून तडीपार केलेला इसम रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण हा खड्डा गॅरेज मंगळवार पेठ पुणे येथे जवळ पिस्टल बाळगुन थांबलेला आहे. त्यानंतर युनिट प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी आदेश दिले असता.
नमुद ठिकाणी जावुन त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले असता त्यास नाच पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण रा २०७ सोमवार पेठ पुणे ११ दारुवाला पुल श्रेयस अपार्टमेंन्ट सध्या रा वेणु अपार्टमेन्ट तिसरा मजला निगडी प्राधिकरण पिपरी चिंचवड पुणे असे सांगीतले, समर्थ पोलीस स्टेशन येथे चौकशी करता तो पुणे शहरातुन दोन वर्षाकरीता तडीपार असलेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याची अंगझडती घेता त्याचेकडे १) काळे रंगाये रिव्हॉलवर २) एक सिल्हर रंगाये गावठी पिस्टल ३) एक सिल्व्हर रंगाची मॅगझीन असा एकुण ७०,५००/- रु मुददेमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक ५६५/२०२२ मा. द. वि.७५ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा तपास सपोनि विशाल मोहिते गुन्हे शाखा युनिट २ हे करीत आहेत, सदर आरोपीरा अटक करून, त्याची पोलीस कस्टडी घेतली असता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये १) ४०,०००/- रुपयांचे पिस्टल २) ३०,०००/- रुपयांचे दोन गावठी कट्टे ३) ९००/- चे तीन राउंड पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहे अशा प्रकारे आरोपीकडुन ५ अग्नीशस्त्र व काडतुसे असा एकुण १,४१,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आहे.
सदर आरोपी पुणे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याचेवर जबरी चोरी, शरीराविरुध्द गुन्हे करणारा असून त्याचेवर पुणे शहरात आर्म अॅक्ट व जबरीचोरीचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच एका गुन्हयात पाहिजे आरोपी असून समर्थ पोलीस स्टेशन कडुन पुणे जिल्हयातून तडीपार आहे… येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ५८४/२०२१ मा ६ वि क ४२७,५०४, आर्म अॅक्ट ४/२५.म.पो अॅक्ट ३७(१) ३१३५२)सांगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक २४८/२०१२ मा.द.वि.क. ४५२.५०९, १४३, १४७, १४९. ३२३ क्रिमीनल लॉ अॅमेन्टमेन्ट कलम १९३२ चे कलम ७ ३) समर्थ पोलीस स्टेशन येथुन पोउपआय परि-२ यांचे कडील आदेशक्रमांक ५० / २१ अन्वये २२/२/२५ पुणे जिल्हयातून तडीपार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, मा. सहा.पो. आयुक्त, गुन्हे श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२. पुणे शहर, सपोनि. विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे, पोउपनिरी नितीन कांबळे व पोलीस अगंलदार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, राहुल राजपुरे गणेश थोरात संजय जाधव, गजानन सोनुने, विजयकुमार पवार, प्रमोद कोकणे ‘उज्वल मोकाशी उत्तम तारु, समीर पटेल, कादीर शेख, निखील जाधव, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरडे नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…