आमदार कुणावार यांच्या प्रयत्नाने वनविभागाची तज्ञ चमू रिमडोह शिवारात दाखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत केली होती विनंती.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट / समुद्रपूर:- तालुक्यातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार असून सदर वाघ हा समुद्रपुर तालुक्यातील खापरी कोरा शिवारात काही शेतमजूरांना दिसला त्यांनंतर हा वाघ पारडी शिवार मार्गे जाम व हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट परिसरात दिसला होता. सध्या स्थिती तो रिमडोह शिवारातील श्री. कोचर यांच्या शेतात आढळून आल्याची माहिती आहे.
या वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती. आमदार कुणावार यांच्या मागणीची दखल घेत वनमंत्री यांनी संबंधित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना तज्ञ चमू पाठविण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे वन अधिकारी श्री. हेपट, श्री. पवार.श्री. खेडकर, श्री. गांवडे व श्री. खोब्रागडे व ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तज्ञ चमू त्याठिकाणी पोहचली असून या वाघाला पकडण्यात यश येईल अशी आशा आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे हिंगणघाट परिसरातील नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन सुध्दा आमदार कुणावार यांनी केले आहे
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…