संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सुप्रसिद्ध गायक मिमिक्रिकार प्रोफेसर सचिन विटेकर मुंबई यांच्या (27 जुलै) वाढदिवसानिमित्त स्वर विचार मंच शेगाव समुहा द्वारा खुल्या राज्यस्तरीय व्हिडिओ गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजुरा येथील शिक्षिका करुणा गावंडे जांभूळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून राजुरांच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना सचिन विटेकर यांच्याकडून प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांना 1001 रुपये, द्वितीय क्रमांक 701 रुपये, तृतीय क्रमांक 501 रुपये, उत्तेजनार्थ 501 रुपये असे रोख रकमेचे बक्षीस व सोबत प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम क्रमांक करुणा गावंडे जांभूळकर राजुरा, द्वितीय क्रमांक प्रकाश झामरे शेगाव तृतीय क्रमांक नितेश रणजीतकर व अनिल सनेर आणि उत्तेजनार्थ कपिल ईटनकर राजुरा यांनी पटकावला. या स्पर्धेचे स्वरूप म्हणजे आयोजकांनी दिलेले गीत, गायन करून त्याचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठवणे. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्रीमती डॉ. रजनी हुद्दा (संगीत विशारद) व मोना गोरे (संगीत विशारद) हे लाभले.
नुकताच 29 जुलै 2024 ला या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला व सोबतच रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेकरिता अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांना प्रोत्साहन देणारे समूह प्रमुख शिवशंकर चिकटे सर यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करून करुणा गावंडे यांनी या यशाचे श्रेय त्यांचे पती विजय जांभुळकर व संगीत क्षेत्रातील गुरु अलका सदावर्ते (संचालिका आरोही सुगम संगीत विद्यालय) यांना दिले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मनोहर साळोंखे यांनी केले तर सहभागी सर्वांचे आभार सचिन विटेकर सरांनी मानले. काशीराम खरडे सरांनी सुंदर असे प्रमाणपत्राचे ग्राफिक्स तयार करून सहभागी सर्वांना वितरित करण्यात आले.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…