ऑफलाईन पद्धतीने राशन वितरण करण्याचीही केली मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- मोदी सरकार डिजिटल इंडिया चा नारा देत, प्रत्येक योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्यापही नेटवर्क चे जाळे पोहचू शकले नाही. इंटरनेट च्या शोधात नागरिकांना कोसो दूर जावा लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लोकांना राशन वाटप करण्यात येते, त्यासाठी लोकांच्या बोटांचे अंगठे स्कॅन केल्या जाते त्याकरिता सुद्धा इंटरनेट चा वापर होते मात्र विस्कळीत झालेल्या इंटरनेट च्या सुविधेमुळे राशनदुकानदार राशन वाटप करू शकत नसल्याने, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि राशन दुकानदारांना सुद्धा बसत आहे व अनेक नागरिक राशन घेण्यापासून वंचित राहत असल्याने ऑफलाईन पद्धतीने राशन वितरीत करण्याची मुभा देण्यात यावी.
नेटवर्क च्या समस्यामुळे रुग्णांना वेळीच सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने 18 किमी खाटेवर बसवून दवाखान्यात न्यावे लागत आहे अस्या बऱ्याच समस्या इंटरनेट च्या अभावामुळे होत असून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात इंटरनेट चे जाळे प्रथम प्रधान्याने मजबूत करण्याची मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या कडे केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…