अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन नगर परिषद कामगाराचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असुन नगर परिषदेत प्रशासनाकडून तथा कंत्राटदारा कडून कामगार वर बऱ्याच वर्षापासून अन्याय होतांना दिसत आहे.
नगर परिषद हिंगणघाट येथिल घंटागाडी, महिला, टॅक्ट्रर कामगाराच्या मागण्याबाबत मार्च 2024 पासून ते जून 2024 पर्यंत अनेक विनंती निवेदन देण्यात आले. परंतु अजून पर्यंत याची दखल घेण्यात आली नाही. याकरिता 7 आगस्ट रोजी उपरोक्त मागण्यांकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगणघाट नगर परिषद प्रशासन व कंत्राटदारा कडून, मानविय दृष्टीने, गांर्भिय पूर्वक लक्ष न दिल्याने, न्याय मिळणे दुरापस्त झाले. म्हणून हा जन आक्रोश मोर्चा नगरपालिका येथे धडकणार आहे. या मधे प्रमुख मागण्या.
१) किमान वेतन कायदा १९४८ (Minimum Wages Act 1948) प्रमाणे उपरोक्त कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा. २) कर्मचारी भविष्यनिधी योजना १९९५- ३६(२) क नुसार CPF पावती देण्यात यावी. ३) कर्मचारी भविष्य निधी योजनेत सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे नांव समाविष्ट करून त्या कर्मचाऱ्यांना CPF पावती देण्यात यावी. ४) कर्मचाऱ्यांना पगाराची पावती देण्यात यावी. ५) पगाराची तारीख निश्चित करावी. इत्यादी साठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…