अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील वणा नदीच्या पुला समोर एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास 4 अज्ञातांनी दुचाकीस्वारा जवळील 50 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची माहिती आज रविवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव झोंटीग व त्यांचा मुलगा समिर झोंटीग राहणार आजनगाव हे दुचाकी क्रमांक एम एच 32 एल 4735 या वाहनाने हिंगणघाट वरुन 50 हजार रुपये घेऊन जात असताना त्यांचे पाठीमागुन येणाऱ्या पांढऱ्या रंगाची कार ज्या मध्ये दोन भगवे कपडे धारी एक नागोडा बाबा व वाहन चालक असे कार मध्ये येवुन दुचाकी स्वारांना आश्रमा बाबत माहीतीचा बहाना करुन थांबण्याचा ईशारा केला. दुचाकी वाहन रोडच्या कडेला थांबले असता वाहनातुन दोन भगवे धारी इसम वय 32 ते 35 वर्ष व नागोडा बाबा वय अंदाचे 45 वर्ष असे कारचे खाली उतरले. भगवेधारी कपड्यातील एका इसमाने हात मागे पकडुन दुस-या इसमाने अंगावरील कपडे चेक कडुन पॅन्टच्या डावे खिशात रोख असलेले 50 हजार रुपये जबरिने हिसकावुन वाहनात बसुन पसार झाले.
याबाबत हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून. अज्ञात 4 आरोपी विरुद्ध विविध कलमा अन्वये तक्रार दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…