मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सलग दहा ते पंधरा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीची फटका अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांना बसली असून यात शेतकऱ्यांची उभी पिकांसह अनेक नागरिकांचे राहत्या घरांचे पडझड झालेली आहे.यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतातील पिकांचे आणि घरांचे पडझड झालेल्या गरीब नागरिकांचे तात्काळ मोका पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी केली आहे.
अहेरी विधानसभेत झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा, अहेरी, भामरागड, मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली असून अनेक गरीब लोकांचे घरही कोसळल्याने बेघर झाले आहेत. या अतिवृष्टीुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवली आहे.
अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे मोका पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि बेघर झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची काँग्रेसचे युवा नेते अजय कंकडालवार यांनी केली आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…