उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळाली कॅम्प:- आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आशा वर्कर सेविका यांचा उपक्रम बाळाचे संगोपन कसे करावे याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यशाळा प्रसंगी डॉक्टर स्वाती, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर कुमावत, डॉक्टर हुंडाराव देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या परिचारिका व नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र शिगवे बहुला मेडिकल ऑफिसर जयश्री पाटील कार्यक्रम सहाय्यक नीता गरुड आरोग्य सेविका, मनीषा गोसावी, नयना डावखर व आशा वर्कर स्वयंसेविका 25 अशा सेविकांनी नाट्यपथक सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सुजाता अहिरे, कविता पाळदे, आरती डांगे, अलका गोडसे, सविता गीते, अर्चना पगारे, अनिता गोसावी व आरती उन्हवणे आदी आशा सेविका यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आशा सेविका यांना विविध प्रकारचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गीत गाण्यांतून सर्व महिलांना माहिती देऊन बाल संगोपन कसे करावे या माध्यमातून डॉक्टर यांनी उपस्थित महिलांना चांगले मार्गदर्शन केले. लहान बाळाची कशी काळजी घ्यावी याप्रसंगी प्रत्यक्ष कृतीही करून दाखवली.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…