✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक रोड:- नाशिक शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच अजुन एक घटना समोर आली आहे. बंद असलेल्या रो-हाऊसचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सुमारे 76 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्या चांदीची दागिने चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील कॅनॉल रोड येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उत्तम सुखदेव सोनवणे रा. चंपानगरी, कॅनॉल रोड, जेलरोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्याने बंद रो हाऊसचे कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे चार वेढे, आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीचे जोडवे व वेढा, चार हजार रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा ऐवज चोरून नेला. दरम्यान, परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढल्याने भितीचे वातावरण आहे.यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बटुळे करत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…