आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.०६ ऑगस्ट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपा व युवा मोर्चाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश करीत आहेत.
आज दि. ०६ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आकाश बोरीकर व पंकज लंबोधरी यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजयुवा मोर्चात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने आकाश बोरीकर, पंकज लंबोधरी, सचिन भुरेभाटे, शुभम लोहकरे, दीपक भुरेभाटे, राहुल खातदेव, सुरज धोटे, राहुल चाकले, गणेश धुरडकर, गौरव बलखंडे , गणेश नक्षीने, योगेश जवणे, वैभव बोरीकर, विकी धोंगडे, सचिन माडे, प्रशांत धुमाळ, श्रावण कांबळे, अमित जोगे, सुरज खोरगडे, ओम कोल्हे, हर्ष वांढरे, प्रशांत शेंडे, शुभम भगत, अजय खंडाळकर , सुधीर हमद, मिथुन जाधव, योगेश हुंडे, नितेश कामडी, रामकृष्ण दुधनकर, नयन निंदेकर, रोहन राऊत, पंकज धुमाळ, सचिन थारकर, रुपेश धुमाळ , निखिल धुमाळ, अभिजीत गुडधे ईत्यादी कार्यकर्त्यांना भा ज युवा मोर्चात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी आमदार समीर कुणावार यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोनू पांडे, तुषार हवाईकर, युती प्रमुख मोनिका कापसे, गौरव तांबोळी, भूषण आष्टनकर, गोलू काटकर, खुशाल चेले, राजू माडेवार समाजसेवक सुनील डोंगरे, रवीला आखाडे, शुभांगी डोंगरे , इत्यादी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…