लेखक:- सुनिल ब. गायकवाड पुणे
पनवती म्हणजे काय असते ? हे भारत मागील दहा वर्षांपासून भारतीय जनता अनुभवत आहे, आता हीच पनवती जिथे जिथे गेली, तेथील सत्ताधारी भोगत आहेत. विरोधकांना तुरुंगात बळजबरीने डांबणे आणि सर्वच यंत्रणा हातात घेऊन मनमानी पद्धतीने निवडणूक जिंकणे हे उद्योग २०१४ पासून भारतात कमी झालेत काय?
देश कुठला ही असो एकेदिवशी जनतेची सहनशिलता संपली कि हुकुमशाही वृत्तीचा अंत ठरलेलाच असतो. अगदी जगभर चाललेला सत्ता संघर्ष पाहिला की हे सहज लक्षात येते, अलिकडच्या काळात जगात अनेक ठिकाणी उलथापालथ झाली आहे उदा.- अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, आणि आता बांगलादेश, इराण, इराक, इजरायल, सिरिया अमेरिकेत सुध्दा जनतेच्या न्याय हक्कांवर गदा आली होती तेथे ही असाच संघर्ष पाहिला होता. भले तेथील प्रश्न हे समान नसतील ही तरी, पाशवी सत्तेमुळे काही लोकं उन्मत्त आणि मुजोर होऊन मनमानी पद्धतीने कारभार करताना दिसतात पण एकदिवशी त्यांच्या उन्मादीपणाचा अंत होतो.
प्रेमात वेडी झालेली माणसे जशी कोणाचेच एकत नाहीत तशीच अहंकाराने ग्रासलेले आणि सत्तेने वेडी झालेली माणसे सुद्धा कोणाचे एकत नाहीत. मग शेवटी आत्मघाता शिवाय दुसरा पर्याय नसतोच. कदाचित उद्या आपल्या कडे सुध्दा अशी परिस्थिती ओढवली जाऊं शकते.
गेली २०१४ पासून हिंदू मताचं सरकार आल्या पासून भारतात सुध्दा धार्मिक धृविकरण करुन जाती जमातीत कुठल्या ना कुठल्या स्वरुपात संघर्ष चालू आहे. किंबहुना तो तसाच चालू रहावा असेच प्रयत्न केले जातात. हिंदूत्ववादी विचारसरणी असलेल्या लोकांना हिंदू राष्ट्रची आणि संविधान बदलण्याची जरा जास्तच खुमखुमी आहे. कारण त्यांना धर्माधिष्ठित कार्यप्रणाली आणून, वर्ण व्यवस्था पुन्हा एकदा स्थापित करुन इथल्या बहुजनांना – शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने पंगू करुन गुलाम करण्यात जास्त आनंद वाटतोय आणि तसे मनसुबे रचले जातायेत सुध्दा पण तीच खुमखुमी पतनाचे कारण होईल आणि… या असल्या माथेफिरू लोकांमुळे सर्व बहुजनांना सन्मानाने जगणारे संविधान सार्वभोम लोकशाहीवादी राष्ट्राची जगात नाचक्की झाल्या शिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे…!
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल…
प्रशांत जगताप मुख्यसंपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- लोकसभेच्या निवडणुका जाहीर…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघात…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात…