अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.९८२२७२४१३६
सावनेर,दि.२० सप्टेंबर:- पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थर संरक्षक कवच म्हणून महत्वाची भूमिका बजावतो. पृथ्वीवरील जीवांचे अतिनिल किरनांपासून संरक्षण करतो. यासाठी जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस साजरा केल्या जातो. स्थानिक भालेराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि ओझोन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, नॅकचे समन्वयक प्रा. मिलिंद बरबटे यांनी भूषविले. पर्यावरणाची काळजी घेण्याची सवय विद्यार्थीदशेपासूनच सुरु व्हावी आणि यात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सर्वांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. विलास डोईफोडे, विभागप्रमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आकांक्षा रुशिया, दीक्षिता नागपुरे, श्रुती जामदार, प्राचिका हाकंदे, निशिता कच्छवाह आणि प्रज्वल धांडे या विद्यार्थ्यांनी ओझोन थराचे जिवसृष्टितील महत्व, त्यास असलेला धोका, ओझोन दिन साजरा करण्यामागील इतिहास आणि सामान्य नागरिकांनी याविषयी घ्यावयाची काळजी यावर विस्तृत विचार प्रकट केलेत. याप्रसंगी वृक्षारोपणासाठी रोपवाटप सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण दुलारे, आभारप्रदर्शन प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पराग निमिषे, प्रा. डॉ. प्रदीप आठवले, प्रा. परीक्षित चौधरी आणि विलास सोहागपुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…