आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 9:- नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज लावून स्वातंत्र्याचा हा उत्सव सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहिमेला जिल्हा परिषद वर्धा येथून आजपासून सुरूवात झाली. जिल्हा परिषद वतीने तिरंगा रॅली काढून हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या तिरंगा रॅली मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास ) सुनील मेसरे, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. पराडकर, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीतू गावंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा भडंग, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज तिरंगा टिब्युट, तिरंगा मेळा या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
ध्वज संहितेचे पालन करा:
राष्ट्रध्वज उभारताना ध्वजाचा योग्य सन्मान तसेच ध्वज संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जितीन रहमान यांनी केले.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…