उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातील इगतपुरी येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था एक अनोखी नाव होय जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून इगतपुरी तीनलकडी ते नवीन तहसीलदार कार्यालय इगतपुरी पायी रॅली काढण्यात आली व त्यानंतर तहसील कार्यालय येथे शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
इगतपुरी तालुका आदिवासी बहुल असूनही तेथील आदिवासी समाज अद्यापही शासकीय योजनांच्या लाभपासून वंचित आहेत. यामधील प्रामुख्याने सामान्य कुटुंबासाठी असलेली शिधापत्रिकापासून अद्यापही बरीचशी कुटुंबे यापासून वंचित आहेत. म्हणुन नारिशक्ती संस्थेच्या सभासद व अध्यक्षा निता वारघडे यांनी तालुक्याचे कर्तव्यक्ष तहसीलदार अभिजित बारवकर आणि नायब तहसीलदार अनिल मालुंजकर पुरवठा विभाग प्रमुख मयूर बागुल, दशरथ जाधव, एस. आय. गोसावी, श्री.बागुल यांच्या उपस्थितीत व सहकार्याने आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबियांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
सदर शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष शालू बबन हंबीर, सचिव शकुंतला मोहन ठाकरे, खजिनदार संगीता आवली, जया संतोष भगत, मंजुळा सराई, सुनिता डोके, ज्योती डोके व सोनी दोरे सामाजिक कार्यकर्ते संतोष भगत, बबन हंबीर बाळू गावंडा या सर्वांच्या सहकार्याने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
समाज उन्नती साठी सदैव प्रयत्नशील राहणाऱ्या अध्यक्षा नीता वारघडे या उपक्रमासाठी अनमोल असे सहकार्य करणारे पोलीस स्टेशनचे साई मुकणे व देवराज पोलीस कर्मचारी यांचे सर्वांनी खूप मेहनत घेतली, यावेळी या उपक्रमासाठी ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वच आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…