विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक विश्राम भवन एटापल्ली येथे एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारीणी गठीत करण्यात आली. एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारीणी कार्यकाल संपुष्टात आला व नविन कार्यकारीणी गठीत करण्याची आवश्यकता असल्याने नवीन कार्यकारीणी लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
यावेळी या बैठकीत प्रथम विषय होता अध्यक्ष निवड करणे. विषयाप्रमाणे आधी चर्चा करण्यात आली ह्या विषयाकरीता शशांक श्रीहरी नामेवार ह्यांनी अध्यक्ष पदाकरिता शेषराव नामदेवराव संगीडवार ह्यांचे नाव सुचविले व ह्या नावाला महेन्द्र राजगोपाल सुल्वावार ह्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ह्या पदाकरिता प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्याचे नाव न आल्याने एकमताने शेषराव नामदेवराव संगीडवार ह्यांचे अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आले.
त्यानंतर ह्याच प्रक्रीयेप्रमाणे उपाध्यक्ष निवड झाली ह्यात उपाध्यक्ष म्हणून जनार्धन ओद्यालु नल्लवार ह्यांची निवड झाली व ह्याला राकेश अनिल तेलकुंटवार हे सुचक होते व अनुमोदन तेजस लक्ष्मण गुज्जलवार ह्यांनी दिले व त्यानंतर प्रतिस्पर्धी नसल्याने जनार्धन ओद्यालु नल्लावार ह्यांची एकमताने उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
त्यानंतर सचिव पदाची निवड झाली त्यात प्रशांत सुशील मंडल ह्यांची अविरोध निवड झाली त्यात सुचक मनीकंठ प्रमोद गादेवार होते व अनुमोदन व्ही. आर. जांभुडकर ह्यांनी दिले. उपसचिव म्हणून राकेश अनिल तेलकुंटवार ह्यांची अविरोध निवड झाली त्यात सुचक जनार्धन ओद्यालु नल्लावार होते व अनुमोदन शेषराव नामदेवराव संगीडवार ह्यांनी दिले. कोषाध्यक्ष म्हणून तनुज श्रीराम बल्लेवार ह्यांची अविरोध निवड झाली व सुचक मनीकंठ प्रमोद गादेवार होते व अनुमोदन राकेश अनिल तेलकुंटवार ह्यांनी दिले. अशा प्रकारे तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारीणी गठीत करण्यात आली व त्याप्रमाणे ठराव पारित करण्यात आले आहे.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…