कार्यक्रमाचे अध्यक्ष राजारामचे उपसरपंच रोशन कंबगौनीवार यांचे हस्ते पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आज दिनांक 09 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अभियान, श्री. चिंता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन राजाराम खा. यांच्या वतीने दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात सदर उपक्रम हे नागरिकापर्यंत पोहोचावेत व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उप पोलिस स्टेशन राजाराम खा. येथील भव्य पठाणगणात जागतिक आदिवासी जन जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशन कंमबगौनिवार उपसरपंच राजाराम, नारायण आत्राम प्रतिष्ठित नागरिक, पत्तिगाव कार्यक्रमाचे उद्घाटक दीपक अर्का प्रतिष्ठित नागरिक पत्तीगाव, प्रमुख पाहुणे म्हणून राजेश मानकर वैद्यकीय अधिकारी राजाराम तसेच श्री. कुंभारे प्राथ. आरोग्य केंद्र, राजाराम, एसआरपीएफ पोउपनी मोरानकर तसेच पोलिस स्टेशन हद्दीतील गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या जनजागरण मेळाव्याची सूरवात भगवान बीरसा मुंडा प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या जनजागरण मेळाव्याचे प्रास्ताविक मध्ये प्रभारी अधिकारी सचिन चौधरी यांनी भव्य जनजागरण मेळावा घेण्याचा उद्देश तसेच नीलोत्पल पोलिस अधीक्षक यांनी ‘प्रोजेक्ट उडान’सर्वकष सक्षमीकरण हा अभिनव प्रयोग सुरू केला असून प्रोजेक्ट उडानमार्फत शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य, क्रीडा स्पर्धा यावर भर देण्यात येत आहे. याबाबत माहिती देऊन विविध प्रशिक्षण व उपक्रम या बाबतची माहिती देण्यात आली. बी ए प्रथम, द्वितीय, तृतीय व पूर्वतयारी पदवी अभ्यासक्रम प्रवेश फॉर्म भरण्यात येत आहे. या बाबत माहिती देण्यात आली.
तसेच पोस्ट ऑफिस, राजाराम खा. येथील पोस्टमास्तर खाने मॅडम यांनी पोस्टाच्या विविध गुंतवणुकी बाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम खा. येथील वैद्यकिय टीमच्या वतीने जनजागरण मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बीपी 40 नागरिकांची तपासणी, शुगर – 30 नागरिकांची तपासणी, मलेरिया टेस्ट- 45 नागरिकांची तपासणी करण्यात आली तसेच इतर किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आला.
तसेच मेळाव्यामध्ये उपस्थित गरजू नागरिकांना खालील प्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले.
त्यात 20 महिलाना साडी वाटप करण्यात आली. कीटक नाशकपावडर 100 नग वाटण्यात आले. 20 नग घमेले, 20 नग छत्री, तसेच जनजागरण मेळाव्यातील नागरिकांना खालील कागदपत्रे वाटप करण्यात आले. 20 नागरिकांना आभा कार्ड, 80 नागरिकांना आधार कार्ड दुय्यम प्रत, 30 नागरिकांना उत्पन्न दाखला देण्यात आला.
यावेळी या मेळाव्या करिता गावातील तसेच हद्दीतील 200 ते 250 महिला पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनी आकाश जाधव यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोउपनी गजानन साखरे यांनी केले. यावेळी सर्व नागरिकांकरिता उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…