उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- ३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघटनेस बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेची कल्पना मांडली. परंतु १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस बाबासाहेबांनी धर्मांतराची तारीख म्हणून निश्चित केल्याने, ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर १९५६ च्या कालावधीत बाबासाहेबांनी पार्टीचा प्रचार व प्रसार या कालावधीत मोठया प्रमाणात केला नाही; परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षात प्रवेश करण्याबाबत तत्कालीन समविचारी नेत्यांशी पत्रव्यवहार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या अपयशाबद्दल वाईट वाटत होते. फेडरेशनऐवजी दुसरा एखादा सर्वसमावेशक असा पक्ष स्थापन करावा लागेल असेही त्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने विचार करून अखिल भारतीय स्तरावर कार्य करण्यासाठी ‘रिपब्लिकन पक्ष’ स्थापन करावयाचे त्यांनी ठरविले होते. आपल्या नियोजित पक्षाला ‘रिपब्लिकन’ असे नाव देण्याबाबत विचार करत असताना, ‘संयुक्त राज्य अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या समोर ठेवून, अब्राहम लिंकन या रिपब्लिकन अध्यक्षाने मोठ्या ध्येय निष्ठेने निग्रोंची गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तो एक आदर्श होता. दुसरे असे, की रिपब्लिकन हा शब्द ‘रिपब्लिक’ या शब्दापासून बनलेला आहे. ‘रिपब्लिक’ याचा अर्थ ‘गणराज्य’ आहे. गणराज्य आणि लोकशाही यामध्ये फरक आहे. गणराज्यात राज्यप्रमुख निर्वाचित असणे आवश्यक असते. लोकशाहीमध्ये तसे असण्याची गरज नाही. भारतात सार्वभौम लोकसत्ताक गणराज्य स्थापन केले आहे. त्या लोकसत्ताक गणराज्य विचार प्रणालीच्या विकासासाठी व गणराज्याच्या घटनेतील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एक रिपब्लिकन पक्ष’ हवा होता. राज्य घटनेच्या सरनाम्यातील उद्दिष्ट्ये व रिपब्लिकन पक्षाच्या घटनेतील उद्दिष्ट्ये जवळपास सारखीच होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्ष मार्च १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच स्थापन करावयाचा होता; परंतु त्यांच्या निधनामुळे ते अशक्य झाले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा त्यांच्या अनुयायांनी ठाम निश्चय केला. अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळावेत यासाठी डॉ. आंबेडकरांनी लढा दिला. दि. ३० सप्टेंबर १९५६ ला डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षेतखाली दलित फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपणांवर आली आहे. त्यासाठी राजरत्न आंबेडकर अतोनात प्रयत्न करत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते व महाराष्ट्र महासचिव वैभव ढबडके अख्खा महाराष्ट्र पिजुंन काढत आहेत.
अकोला जिल्हात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुर्ण ताकदीने उभा करण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील बौध्दमय भारत करण्यासाठी लाखोच्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सामिल व्हा. लक्षात ठेवा आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जा आणि आपल्या घरातील भितिंवर लिहुन ठेवा आम्हाला शासनकर्ती जमात बनायचे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सामिल होऊन शासनकर्ती जमात बनायचे की आयुष्यभर इतर पक्षाच्या नेत्याची चाकरी करून सतरंज्या उचलायच्या हे तुम्ही ठरवायचे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सामिल व्हा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डॉ राजरत्न आंबेडकर) चे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष देविलाल तायडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…