✒️प्रवीण जगताप, प्रतिनिधी
हिंगणघाट:- “द सिम्बॉल ऑफ नोलेज” डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, सिद्धार्थ नगर, हिंगणघाटच्या वतीने “सेव्ह बुक सेफ बुक” (Save Books, Safe Books) या संकल्पनेला बडकटी देत दिनांक 18 सप्टेंबर रोज रविवार आयु. रवि भगत, अध्यक्ष राजेश्री शाहु महाराज नागरी सहकारी पत संस्था, हिंगणघाट यांनी सिद्धार्थ बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर हिंगणघाट येथुन संपन्न होत असलेल्या भारतीय बौद्ध महासभा, तालुका हिंगणघाटच्या वतिने वर्षवास धम्म प्रवचन मालिका या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन विद्यार्थाना शिक्षणसाठी उपयोगी पडणारे शालेय पुस्तके दान स्वरूपात भेट दिले.
आज गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापत होत चाललं आहे. अशा परस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तके मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात त्यामुळे “सेव्ह बुक, सेफ बुक” ही चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभागी होऊन आपली सामाजिक, शैक्षणिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यामुळे रवि भगत यांनी द सिम्बॉल ऑफ नोलेज” डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, सिद्धार्थ नगर, हिंगणघाट याला अनेक पुस्तके दान स्वरूपात दिली आहे.
या प्रसंगी पुस्तके दान स्विकारतांना बौद्ध पंच कमेटी महीला व पुरुष संयुक्त मंडळ सिद्धार्थ नगर हिंगणघाटच्या अध्यक्षा आयु. अनुताई मानकर सचीव आयु.भावनाताई ढेकले व इतर पदाधिकारी सदस्या सोबत च वाचनालय कार्यकारी समितीच्या विश्वस्त सदस्या आयु. विजयाताई झाडे, आयु. साधनाताई दहिवडे, आयु. मनिषाताई तावाडे, आयु. ज्योतीताई मानकर, आयु. मायाताई दुर्गे, आयु. पोर्णिमाताई बोरकर तसेच सिद्धार्थ नगरचे बौद्ध उपासिका सहीत भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी हजर होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…