आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट, समुद्रपुर, सिंधी (रेल्वे) (शहर व ग्रामीण) कार्यकर्त्यांचा मेळावा महावीर भवन हिंगणघाट येथे दि 10 आगस्टला संपन्न झाला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चा हिंगणघाट,समुद्रपुर सिंधी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघावर झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन, मनाने शर्थीने प्रयत्न करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते अँड सुधीर कोठारी यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्या सोबत हितगुज करतांना केले.
विद्यमान महाराष्ट्र सरकार हे सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेले असून ईडी व सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग करून अवैध पणे सत्तेवर आलेले आहे. हे शेतकरी, कामगार, शोषित विरोधी सरकार हटवून राष्ट्रवादी विचाराचे सरकार बसवून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्या साठी कार्यकर्त्यांनी मतभेद व मनभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते अँड सुधीर कोठारी यांनी केले. माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनीही यां अन्यायी सरकार विरोधात जनतेचा आक्रोश वाढत असून लोकसभा प्रमाणेच कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्वश्री हिम्मतराव चतुर, सुरेंद्र कुकेकार, हरीश वडतकर, विनोद वानखेडे, संजय तपासे, मधुकररावं डंभारे, पुंडलिक बकाने, आफताब खान, रामकृष्ण धोटे, राजु भोरे , अनिल भोंगाडे, विजय तामगाडगे, विकी वाघमारे, लिलाधर मडावी, यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन दिपक माडे, प्रास्ताविक हेमंत पाहुणे, आभार पांडुरंगजी निंबाळकर, यांनी मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली. तसेच हिंगणघाट शहरातील युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी चा शेला व पुष्पगुच्छ देवून पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वश्री हरीश वडतकर, मधुकरराव डंभारे, उत्तमराव भोयर, सुरेंद्र कुकेकार, नरेंद्र थोरात, पांडुरंग निंबाळकर, संजय तपासे, विनोद वानखेडे, दिगांबर चांभारे, राजु भोरे, राजेश थोरात, सौ. योगिता तुळणकर, पुंडलिक बकाने, डॉ निर्मेश कोठारी, धनंजय बकाने, सौ. माया जिवतोडे, अरुण झाडे, सौ अर्चना तिमांडे, अनिकेत कांबळे, अरुण झाडें, राजु चंदनखेडे, सुरेश नैनानी , दिपक पंधरे, अरुण बकाल, शालिक वैद्य, रामभाऊ चौधरी, प्रकाश राऊत, संजय चव्हाण, राजु चाफले , प्रदिप डगवार, पिंटू बादले, हेमंत पाहुणे, विनोद झाडे, माणिक लांडगे, डाॅ. युवराज तांदुळकर, संजय कात्रे, लिलाधर मडावी, सलमान शेख, हुसेनखान, मनिष चितलंगे, शालीकराव वैद्य, जगणजी सुमटकर, कृष्णा मुंगले, रंजित चावरे, अमित लाजूरकर, वासुदेव भोयर, रामभाऊ चौधरी, सिद्धार्थ दारुंडे, प्रफुल्ल फुकट, कृष्णाजी महाजन, आनंद कांकरिया, अमर झाडे, हरिभाऊ बोंबले, डोमाजी डंभारे, मनीष गांधी, अनिल भोंगाडे, राजेश भाईमारे, नितेश नवलखेडे विक्रांत भगत, विजय तामगाडगे, सुनील इंगोले, प्रमोद गोहणे, विकी वाघमारे, अशरफ पठाण उर्फ शेरा, सूरज ढोकपांडे, तेजस तडस, निषाद बोरकुटे, मोकिम अंसारी, सुरेंद्र टेंभुर्णे, जितेंद्र सेजवल, अमर झाडे, पंकज पाके, नकुल भाईमारे, पिंटु काळे, संजय कावळे, उमेश डेकाटे, अशोक पवनीकर, नरेश पंपनवार, सुजाता जांभूलकर, स्वाती अवचट, दीपाली रंगारी, मीना दखणे, अमृता दारुणकर, मायाबाई ग्वालवंशी, शीतल तिवारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…