✒️ महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- मालमत्तेच्या जुन्या वादातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांची घुलेवाडी शिवारात कार अडवून दोन महिलांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडून गाडीतून बाहेर ओढत मारहाण केली.
या घटनेचे संपूर्ण प्रकरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करुन ते समाज माध्यमांत व्हायरल केले. याप्रकरणी कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह भारत संभाजी भोसले या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शाळा लागत असणार्या घुलेवाडी येथील रहिवासी असणार्या कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्तेचा वाद सुरू होता. यावरुन नेहमीच अभंग आणि राऊत यांच्यात वादावादी होत असते. त्यातच सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत हे नेहमीप्रमाणे घुले वाडीच्या अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेवून आपल्या कारमधून जात असताना आधीच तेथे हजर असलेल्या विद्या अभंगसह अन्य एक महिला व दोन पुरुषांनी त्यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संतप्त झालेल्या महिलांनी राऊत यांना वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडले. ते वाहनाच्या बाहेर येताच कविता संतोष अभंग यांनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सुरु असताना विद्या अभंग हिने राऊत यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चैन काढून घेतली. गाडीला दगड मारून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. विद्या अभंग यांचा मुलगा प्रथमेश याने आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण चित्रीकरण करुन ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल केले. त्यामुळे घाबरलेल्या माजी सिताराम राऊत यांनी थेट शहर पोलिसात धाव घेत घडला प्रकार कथन केला आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांत माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह भारत संभाजी भोसले या चौघांवर भारतीय दंडसंहितेचे कलम गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…