कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी उप विभागीय अंतर्गत येत असलेल्या पेरमिली पोलीस स्टेशन येथे आज दि. 09 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिना निमित्त गडचिरोली पोलीस दल व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, यतीन देशमुख (अप्पर पोलीस अधीक्षक अभियान), कुमार चिंता (अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन), एम.रमेश (अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी) यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन पेरमीली येथे उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व उप पो स्टे पेरमिली संयुक्त विद्यमाने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे सोबत पेरमिली हद्दीतील गाव पाटील तसेच पोस्टेचे प्रभारी अधिकारी दिपक सोनुने यांच्या उपस्थितीत सर्व प्रथम विर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभारी अधिकारी यांनी गडचिरोली पोलिस दलामार्फत मिळणाऱ्या शासकीय योजना व ईतर दाखवले, मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना या बाबत मार्गदर्शन केले. गडचिरोली येथील आधार कार्ड ऑपरेटर यांना बोलावून आधार अपडेट,जुने आधार कार्ड दुरुस्ती, नविन आधार कार्ड काढून घेणे बाबत नागरिकांना सांगितले.तसेच पेरमिली हद्दीतील कोरेली(बु), आलदंडी ,येरमनार, पल्ले, चंद्रा,कचलेर,कोलसेलगुडम(पेरमिली),या गावातील आलेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तू व शेतीपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले ते खालील प्रमाणे.
1) साडी वाटप- 40
2) टाॅर्च वाटप – 30
3) छत्री – 30
4) घमेले- 15
5) युरिया बॅग- 20
6) लुगळे वाटप- 15
7) फावळा- 15
8) पिवळे दुप्पटे- 20
9) धोतर- 20
10) प्लास्टिक घोंगडी – 50
शासकीय दाखवले काढून दणे:-
1) नविन आधार कार्ड -30
2) आधार प्रिंट -20
3) आभा कार्ड -20
4) सातबारा -30
5) आयुष्यमान कार्ड -12
6) ईन्कम सर्टिफीकेट-08
सदर मेळाव्यास पेरमिली हद्दीतील 450 ते 500 नागरीक उपस्थित होते.उपस्थीत नागरिकांची चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली व मेळाव्याचे सांगता करण्यात आले
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…