आमदार समीर कुणावर यांच्या वर संताप व्यक्त करत महिला संघर्ष समितीची वर्धा जिल्हाधिकारी कडे धाव.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपजिल्हा रुग्णालय मागील ४१ एकर रिक्त जागे मध्ये मेडिकल कॅलेज निर्माण करण्यात यावे या मागणी साठी महिला संघर्ष समितीच्या वतीने अन्न त्याग आंदोलन सुरु केले होते. त्या नंतर तोडगा काढण्या आला.वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे येणार अशा आश्र्वासानावर महिला संघर्ष समितीच्या महिलांनी आपले उपोषण तोडले होते.
आणि आमदार समीर कुणावर ह्यांनी लोकांना विश्वासात घेऊन सांगितले होते. की आपण सर्व मिळून काम करणार आहोत.
पण कोणत्याही सामितीला आणि महिलाना विश्वासात न घेता दिल्ली वरून आलेली मेडिकल चमूची टीम जेव्हा निरिक्षणन करण्यास आली तेव्हा हिंगणघाट रुग्णालया मागील एकच जागा दाखवली गेली आणि नंतर लगेच इतर जागा मध्ये नांदगाव येथील जी ठरविण्यात असलेली जागा न दाखवता दुसरीच जागा दाखवली गेली. कोल्ही येथील जागाही दाखवण्यात आली नाही सरळ जाम येथील नर्सरीची जागा दाखवण्यात आली. जी.आर मध्ये मौजा हिंगणघाट असताना तालुका हिंगणघाट असताना. उपमुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी पण जाहीर केले गेले होते की हिंगणघाट येथेचे महाविद्यालय व्हावे. मग लोकप्रतिनिधींनी
जामची जागा दाखवण्यासाठी चमूला कसे काय घेऊन गेले. म्हणजे हिंगणघाटच्या लोकांना फक्त आश्वासन द्यायचे आणि मत घ्यायचे इतकेच काम आता लोप्रतिनिधीला दिसते. ज्या भागात लोकसभा मध्ये गड्डे पडले. तिथे मेडिकल कॉलेजचचां लॉलीपॉप देऊन ते गड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मतदातांना अंधारात ठेवून याप्रकारे हिंगणघाटच्या लोकांना लॉलीपॉप देऊन चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शित केले आहे तसेच इतरही ठिकाणच्या लोकांसोबत हे होऊ शकते.
जसेही महिला संघर्ष समितीला याच भनक लागली तेव्हा तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे एक धरण आंदोलन आणि घेराव यासाठी प्रचारण केले व आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी त्यांनी त्या संबंधात निवेदन जिल्हाधिकारी मार्फत सरकारला समर्पित केले. याच धरतीवर हिंगणघाट मध्ये येत्या एक-दोन दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची लाट पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत.अशी महीला संघर्ष समितीच्या महिलांनी चेतावणी दिलेली आहे.
आजचे निवेदन देताना महिला संघर्ष समितीच्या सर्व महिला उपलब्ध होत्या. त्यामधे रागिणी शेंडे, सुजाता जांबुळकर, सीमा तिवारी,योगिता रंगारी, सुजाता जीवनकर, विद्या गिरी, चंदा येलेकर, सुनीता तामगाडगे, दीपाली रंगारी तर पुरुषां पैकी संघर्ष समितेचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, वासुदेव पडवे, सुरेंद्र बोरकर, राजेश भाईमारे, सुरेंद्र टेबूर्णे, सुनील हरबुडे, अमित रंगारी इत्यादी उपस्थित होत्या.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…