विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसंपर्क भगवा साप्ताहिक अभियानाचे औचित्य साधून शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून सभासद नोंदणी करून पक्षप्रवेश कार्यक्रम मुलचेरा येथे संपन्न झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना सचिव विनायक राऊत, पूर्व विदर्भ संपर्क नेते तथा आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली, मुलचेरा तालुका प्रमुख समर मुखर्जी यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क भगवा साप्ताहिक अभियान हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे नारे देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली अक्षय पुंगाटी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करावे तसेच शिव संपर्क भगवा साप्ताहिक अभियान प्रत्येक तालुक्यामध्ये, गावागावांमध्ये आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात यावा. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक उपक्रम राबविण्यात यावे असे प्रतिपादन दिले. त्यानंतर महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रीमती करुणा जोशी यांनी मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने व जोमाने पक्ष संघटनेचे कार्य करावे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार असे मनोगत व्यक्त केले.
शिवसेना तालुकाप्रमुख समर मुखर्जी यांनी मार्गदर्शन करताना मुलचेरा तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात शिव संपर्क भगवा साप्ताहिक अभियान राबवताना शिवसेना सदस्य नोंदणी चे काम जोमाने करण्यात येईल. गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा मंत्र ध्यानात ठेवून पक्ष वाढीसाठी काम करणार असे आश्वासन देण्यात आले. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलचेरा तालुक्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये भगवा झेंडा फडकवणारच असा संकल्प पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना शिवसंपर्क भगवा साप्ताहिक अभियान राबवत असताना ०४ ते १४ ऑगस्ट दरम्यान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर व प्रत्येक खेड्यापाड्यात भगवा ध्वज तसेच घरामध्ये मशाल फोटो लावावे, जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करावे, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवबंधन कार्यक्रम घेण्यात यावे. विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर, मतदारा नोंदणी अभियान, गरजूंना शालेय साहित्य वाटप, शेतकरी बंधू-भगिनींना रेनकोट वाटप, तसेच गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी मुळे प्रत्येक गावागावात पूर परिस्थितीचा आढावा घेणे व त्या संदर्भात शासनाला पाठपुरावा करणे, पावसाळ्यातील आजारा विषयी जनजागृती, स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व ठाकरे परिवार यांच्या संदर्भात संवाद व माहिती देणे असे अनेक उपक्रम या शिवसंपर्क भगवा साप्ताहिक अभियान अंतर्गत राबविण्यात यावे अस आव्हान पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. बांगलादेश मध्ये हिंदू लोकांवर होत असलेला हिंसाचाराचा तीव्र निषेध करत त्या संदर्भात पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यामार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांना लवकरच देण्यात येईल असे सांगण्यात आले.
मुलचेरा तालुक्यातील इतर पक्षाच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रियाज शेख, महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रीमती करुणाताई जोशी, युवती सेना जिल्हा अधिकारी तुळजा ताई तलांडे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली अक्षय पुंगाटी, सिरोंचा तालुकाप्रमुख रघुनंदन जाडी, सिरोंचा तालुका संघटक दुर्गेश तोकला, नामदेव हीचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली, पुष्पश्री मुखर्जी ग्रामपंचायत सदस्या, टीना राॅय तालुका संघटिका मुलचेरा, अरुणा निकोडे तालुका संघटिका एटापल्ली, नक्कीर शेख शहर प्रमुख अहेरी, इब्राहिम शेख उपशहर प्रमुख अहेरी, रंजीत लेकामी शिवसेना विभाग प्रमुख जरावंडी क्षेत्र, विशाल मेश्राम शाखाप्रमुख, अमर भक्त, महादेव सरकार, अविनाश दास, चंदन शील, प्रसंजीत चक्रवर्ती आदी सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…