मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेले अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा अनुसूचित जाती जमातीचे अस्तित्वात नष्ट करणारा आहे. हया करिता समस्त आदिवासी बंधू -भगिनींनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी पुकारलेल्या भारत बंद मध्ये पूर्णतः सहभागी व्हावे असे आवाहन विलास कोडापे जिल्हाध्यक्ष आदिवासी परधान जमात पंचायत जिल्हा गडचिरोली यांनी केले. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासी परधान जमात पंचायत आलापल्ली चे वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला त्यावेळेला समाजाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना विलास कोडापे बोलत होते.
आदिवासी व दलितांचा आरक्षण वर्गीकरणाने कसे संपणार आहे हे सविस्तर समजवून सांगितले.
आदिवासी समाजाने संघटित राहून येणाऱ्या सर्व समस्यांचा संघर्षमय सामना करावा. आपल्या प्रत्येक समस्या मध्ये मी आपला पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे वक्तव्य गडचिरोली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा विद्यमान सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना केले.
अजय कंकडालवार हे यावेळेस कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याने यावेळेस आदिवासी परधान जमातीला जागा मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले व त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष असताना समाज मंदिर बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिले याची आठवण करून दिली. तसेच फक्त आदिवासी समाजासोबत इतरही समाजाला शासकीय निधी मिळवून दिल्याचे सांगितले.
यावेळेस शिवाजी झोरे संपर्कप्रमुख शिवसेना (उबाठा) गडचिरोली विधानसभा, वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा गडचिरोली विधानसभा, अरुण धुर्वे सर शिवसेना उपजिल्हा प्रमुख, हनुमंत मडावी सेनि. उप वनसंरक्षक, संदीप कोरेत, समाजसेवक यांनी सुद्धा आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात आलापल्ली शहरातून आदिवासींच्या वाद्यावरती आदिवासी परंपरेनुसार नृत्य करत मिरवणूक काढण्यात आली. शहीद वीर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाकेच्या फलकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक आदिवासी परधान समाज मंदिराचे पटांगणावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास कोडापे जिल्हाध्यक्ष आदिवासी प्रधान जमात पंचायत गडचिरोली, उद्घाटक अजय कंकडालवार, शिवाजी झोरे, वासुदेव शेडमाके, अरुण धुर्वे, बिरजू गेडाम, किरण शेडमाके, दिलीप सुरपाम अध्यक्ष आदिवासी परधान जमात पंचायत आलापल्ली, सौ प्रीती विलास कोडापे, कन्नाके ताई, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचा मानचिन्ह व मोर पंख देऊन सत्कार करण्यात आला.
याच दिवशी विलास कोडापे यांचा जन्मदिवस असल्यामुळे समाजाचे वतीने कार्यक्रमास्थळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला आलापल्ली येथील आदिवासी परधान समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रघुनाथ तलांडे माजी अध्यक्ष यांनी केले तर आभार दिलीप सुरपाम, अध्यक्ष आदिवासी उत्सव समिती यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत आलाम उपाध्यक्ष, सागर मेश्राम, सचिव, करमचंद कोवे, कोषध्यक्ष तथा समाजातील सर्व बंधु भगिनींनी प्रयत्न केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…