पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील शासकीय रुग्णालय असलेल्या मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर मंगळवारी सकाळपासून संपावर गेल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. संपातून आपत्कालीन रुग्णसेवा वगळण्यात आली असली तरी ओपीडी, वॉर्ड, नियोजित शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची कामे खोळंबली असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
कलकत्ता येथील ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेज मधील निवासी एका महिला डॉक्टरवर निर्घृणपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेची संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि निषेध नोंदवत जात आहे. निवासी डॉक्टरांसाठी कार्य करणारी संघटना ‘सेंट्रल मार्ड’ने मंगळवारपासून देशभरात संप पुकारला. यात नागपूर येथील मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरही सहभागी झाले होते. संपाचा रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून दोन्ही रुग्णालयांनी वरीष्ठ निवासी डॉक्टरांसह, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी डॉक्टरांवर विशेष जबाबदारी टाकली होती. असे असतानाही रुग्णांची हिस्ट्री घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यापासून ते डिस्चार्ज देण्याचे काम निवासी डॉक्टर करीत असल्याने मंगळवारी ते प्रभावित झाल्याचे दिसून आले.
नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत मोजकेच डॉक्टर काम करीत होते. त्यामुळे उपचारात उशीर होण्याचे प्रमाण वाढले होते. काही विभागाच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान सकाळी ‘ओपीडी’समोर निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन नारे निदर्शने केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…