मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुका महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुना तालुका असून राज्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगढ़ आणि तेलंगाना राज्याच्या सीमे लगत आहे. या तालुक्याच्या सीमेला लागून 12 महीने वाहणारी प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या आहेत. भरपूर जल संपत्ती आहे, भरपूर जंगल संपत्ती आहे, भरपूर खनिज संपत्ती आहे, शेती व्यवसायासाठी सुपीक जमीन आहे, नैसर्गिक सौंदर्य प्राप्त असलेले अनेक पर्यटन स्थळ आहेत. पर्यटन विकास व व्यवसायासाठी पूरक वातावरण आहे.
छत्तीसगढ़ व तेलंगाना या दोन राज्यांना महाराष्ट्राशी जोडणारे तीनतीन महामार्ग आहेत. स्वातंत्र्यापूर्वी जिल्हा मुख्यालयाचा दर्जा असलेल्या सिरोंचा चा स्वातंत्र्याच्या 78 वर्षांत पाहिजे त्याप्रमाणात विकास झाला नाही. राज्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने सिरोंचा तालुक्याच्या विकासाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अन्याय करत असल्याची भावना जनतेची आहे. खरतर या तालुक्यात उपलब्ध साधन संपत्ती वर आधारित अनेक लहान मोठे उद्योग उभारून या तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या तालुक्याचा विकास झाला नाही. उलट एकेकाळी विधानसभा क्षेत्राचे नाव सिरोंचा विधानसभा या नावाने असलेले सिरोंचा विधानसभा क्षेत्र हे नाव सुद्धा बदलवून अहेरी निर्वाचन क्षेत्र करण्यात आले असल्याने शासना कडून सिरोंचा तालुक्याचे महत्व कमी करण्यात आले म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
पूर्वीचे सिरोंचा निर्वाचन क्षेत्र आताच्या अहेरी निर्वाचन क्षेत्रातील सुरजागड येथे लोह प्रकल्प उभारण्यात आले त्या प्रकल्पावर आधारित नवीन उद्योग उभारण्यासाठी कोणसरी व अहेरीला प्राधान्य देण्यात आले. याचा आनंद असला तरी उद्योग निर्मितीसाठी सिरोंचा तालुक्याचा विचार करण्यात आला नसल्याने अन्याय झाल्याचा दुःख आहे. सुरजागड प्रकल्पावर आधारित उद्योग सिरोंचा तालुक्यात सुद्धा उभारण्यात यावे. तसेच वनसंपदा, खनिज संपत्तीवर आधारित उद्योग, शेती संबंधित फूड प्रोसेसिंग व इतर उद्योग कारखाने उभारून रोजगार निर्मिती करून औद्योगिक विकास करने अपेक्षित आहे. सुरजागड लोह प्रकल्पाचा ही लाभ सिरोंचा तालुक्याला झालाच पाहिजे. सरकारने लोह प्रकल्पावर आधारित उद्योग उभारून या तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावे ही जनतेची मागणी आहे.
सिरोंचा तालुक्याच्या विकासाबाबत शासनाकडून सावत्र वागणूक आणि विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याने जनमानसात नाराजी आहे. सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या रेल्वे मार्गाला ही मंजूरी देण्यात आली नाही. गडचिरोली जिल्हा मुख्यालय सिरोंचा तालुक्याच्या सीमेपासून 280 किलोमीटर अंतरावर असल्याने शासन दुर्लक्ष करत आहे? यामुळे सिरोंचा तालुका विकासा पासून वंचित आहे. करिता गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून सिरोंचा तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देऊन विकास करण्याची गरज आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने नवीन स्वतंत्र सिरोंचा जिल्हा घोषित करण्यात यावे ही जनतेची मागणी जोर धरू लागली आहे. सिरोंचा जिल्हा घोषित करून या क्षेत्राचा विकास करण्यात यावा ही जनतेची मागणी आहे. माजी शिवसेना उप जिल्हाप्रमुख सत्यनारायण बुर्रावार यांनी स्वातंत्र्यच्या 77 व्या वर्षी सुद्धा एकही उद्योग धंदा नाही असे सरकार वर टीका करत शोकांतिका व्यक्त केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…