✒️सतिश म्हस्के, जालना प्रतिनिधी
जालना:- आज ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कोण कधी कशी फसवणुक करेल सांगता येत नाही.
बदनापूर शहरातील बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशिक्षित गोरगरीब जनतेला खात्यात पैसे किती जमा करण्यात आले किंवा खात्यातून किती पैसे/रक्कम काढली याची पावती देणे बंधनकारक असतांना देखील सदरील ग्राहक सेवा केंद्र चालक अशिक्षित असलेले गोरगरीब जनतेला पावत्या का देत नाही? कारण त्यांनी पैसे किती भरले किंवा किती पैसे काढले त्याची पावती दिली तर गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक कदाचित होणार नाही. सर्वच ग्राहक सेवा केंद्रांवर संबंधित बॅंकेचे अथवा कंपनीचे लोकांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सर्वच ग्राहक सेवा केंद्रांवर व्हिडिओ कॅमेरे असले तर कोणाचीही आर्थिक फसवणूक अथवा कोणत्याही ग्राहक सेवा केंद्र चालक किंवा जनतेला आर्थिक फटका बसणार नाही. परंतु ग्राहक सेवा केंद्रांवर संबंधित बॅंकेचे अथवा कंपनीचे लोकांनी नियंत्रण ठेवण्यासाठी ऐवजी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु संबंधितांनी ग्राहक सेवा केंद्रांवर लक्ष दिले तर आर्थिक फसवणूक सह आदी घटनांवर आळा बसेल आणि अशा घटनांवर आळा घालण्यासाठी संबंधित बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्रांवर व्हिडिओ कॅमेरे बसविण्याच्या सुचना देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.
संबंधित ग्राहक सेवा केंद्र चालक नागरिकांना पावत्या देतात की नाही? याची चौकशी करून जो पावती देत नसेल त्याचे ग्राहक सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…