संजय राऊत यांच्यावर गेल्या आठवड्यात ईडीने पुरवणी दोषारोपपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रा
✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई, 21 सप्टेंबर:- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत याची मुश्किल अजुन वाढली आहे. पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. या प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली, असल्याची धक्कादायक माहिती स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिली.
संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यात वळविल्याची माहिती राऊत यांची माजी सहकारी आणि पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिली.
संजय राऊत यांच्यावर गेल्या आठवड्यात ईडीने पुरवणी दोषारोपपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रात पाटकर यांचा जबाब जोडण्यात आला आहे. राऊत यांनी राऊटर्स एन्टरटेन्मेंट एलएलपीची स्थापना केली या कंपनीने ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली. या कंपनीत त्यांनी बेहिशेबी रक्कम वळविली तसंच त्यांना मद्य कंपनीतही रस होता. त्यांनी 2021 मध्ये एक मद्य कंपनी घेतली. याव्यतिरिक्त राऊत यांनी बेहिशेबी पैसे त्यांचे कुटुंबीय आणी सहकाऱ्यांच्या नावे काढलेल्या बनावट कंपन्यांत गुंतवले, असे पाटकर यांनी ईडीला जबाबात सांगितल.
‘मी कोणत्याही कंपनीशी संलग्न नाही. माझी पत्नी आणि मुलगी एन्टरटेन्मेंट कंपनी चालवित असल्याचे राऊत यांनी ईडीला चौकशीत सांगितलं आहे. जानेवारी २०१५ मध्ये ‘बाळकडू’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तरीही या चित्रपटाने ६० लाखांचा नफा कमावला. संजय राऊत यांनी चित्रपट निर्मितीत कोणतेही योगदान न देता माझ्याकडून त्यांच्या नावे ५० लाखांचा धनादेश घेतला,’ अशी माहितीही पाटकर यांनी दिली.
संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम वळती करण्यासाठी त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि अन्य कुटुंबीयांच्या नावे जमीन खरेदी केली. एका जमीनमालकाला त्याची जमीन विकण्यासाठी राऊत यांनी धमकावल्याचे सुजित यांनी सांगितल्याचे पाटकर यांनी म्हटलं आहे.
स्वप्ना पाटकर यांनी २००८ ते २०१४ पर्यंत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये स्तंभलेखक म्हणून काम केले होते. ‘सामना’मध्ये काम करत असताना कार्यालयात प्रवीण राऊत अनेक वेळा यायचा आणि तो रोख रक्कम संजय राऊत यांना द्यायचा, असेही पाटकर यांच्या जबाबात नोंदवले आहे.
अलिबागमधील मालमत्तेबाबत विचारणा केल्यानंतर त्या म्हणाल्या, सर्व मालमत्ता २०१०-२०१२ दरम्यान खरेदी करण्यात आली. वेगवेगळ्या जमीन मालकांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. त्यावेळी त्यांचे नोंदणी मूल्य एक कोटी रुपये होते. मात्र, कमीत कमी किंमत दाखविण्यात आली आणि राऊत यांनी सर्व व्यवहार रोखीने केले, असंही पाटकर यांनी सांगितलं.
राऊत हे अलिबागचेच असल्याने ते मालकाना जबरदस्तीने जमीन विकण्यास भाग पाडत. त्यांनी विकत घेतलेल्या जमिनींची किंमत ९ ते १० कोटी रुपये आहे, मात्र, नोंदणी किंमत केवळ ५१ लाख रुपये दाखविण्यात आली. जमिनीचे व्यवहार रोखीने झाले, याची माहिती तुम्हाला कशी? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाटकर यांना केला. माझे पती सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्यावतीने सर्व जमीन मालकाशी रोख रकमेच्या व्यवहाराबाबत समन्वय साधत होते. जमीनमालक आणि माझ्या पतीमध्ये झालेल्या अनेक चर्चाची मी साक्षीदार आहे, अशी माहिती पाटकर यांनी ईडीला दिली.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे झालेल्या बैठकीत…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 'वाचन ही ज्ञानभांडाराची गुरुकिल्ली…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लीपुर येथे मकर…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 13 जाने:- महान तत्वज्ञ…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- राजमाता मॉ जिजाऊ व…
आरिफखांन हबीबखांन पठान यांची पत्रकार परिषदेत लावला अंजूमन हामी ए इस्लाम संस्थेवर गंभीर आरोप. पल्लवी…