मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बदलापूर येथे शाळेत दोन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने राज्यात नराधम आरोपीला शिक्षा करून पिढीत मुलींना न्याय मिळाला पाहिजे म्हणून अत्याचाराचा निषेध करून आंदोलन करण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ यांच्या मार्गद्शनाखाली तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे व महिला आघाडी जिल्हा संघटिका संगीता कडू यांच्या नेतृत्वाखाली काल बदलापुर मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचारा विरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन कारंजा चौक येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी याविकृत घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, हिंगनघाटच्या अनेक शिवसैनिकांची व शाळेकरी मुलींची उस्फुर्त उपस्थिती या आंदोलनात होती. हे आंदोलनं यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख सतीश ढोमने, माजी न प उपाधक्ष श्रीधर कोटकर, विठल गुळघाने, अभिनंदन मुनोत, तालुका संघतिका माधुरीताई खडसे, सौ स्मिता आष्टीकर,लक्ष्मण बकाने, डॉ. आदर्श गुजर, शंकर मोहमारे, सुनील आष्टीकर, शहर संघटक गजानन काटवले, युवासेना शहर प्रमुख भूषण कापकर, दिलीप चौधरी, मनोजभाऊ वरघने, शंकर झाडे, भास्कर मानकर गौरव डफ, आनंद जगताप, महेश खडसे, सुभाष काटकर, रणजित रहाटे,प्रा हवाईकर, प्रशांत आवारी, निलेश शिंदे, पोहरे सर, आदित्य कडू, अभय गुळघने, वैभव ढाले, नीरज भोयर, सुमित ढाले, सतिश गुरनुले, लक्ष्मण कापकर, विशाल गुग्लानी इत्यादींची उपस्थिती होती.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…