अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- शहरातील महाजन लेआऊट वार्ड नंबर ८ मधील श्री. राधा कृष्ण देवस्थान समितीच्या वतीने तीन दिवसीय गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाचे तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. राधा कृष्ण देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन.
25 ऑगस्ट ला सकाळी 8.00 वाजता श्रीचा महाअभिषेक व तीर्थ स्थापना आरती, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत गोतमारे गुरुकुल सावनेर तर्फे सामाजिक प्रबोधन व भजन संध्याचा कार्यक्रम होईल. रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत वारकरी संचातर्फे हरिपाठ होईल. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत ह. भ.प.श्री. यादवराव भादे महाराज (भारुड सम्राट) पांढर्णा (सिवनी) यांचे भारुड व 12 वाजता आरती करण्यात येईल.
26 ऑगस्ट ला सकाळी 6 वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत महिला भजन मंडळ यांचे भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 6 ते 8 हरिपाठ, सायंकाळी 9 ते 12 गुरुवर्य ह.भ.प. नारायण महाराज शेंडे भागवताचार्य रामायणाचार्य (मु.देवी ज्ञानेशाची) प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय भागवत धर्म परिषद मध्यप्रदेश यांचे कीर्तन व कृष्णजन्मोत्सव होईल.
27 ऑगस्टला सकाळी 6 वाजता सकाळी 9 ते 10 पर्यंत पालखी सोहळा. दुपारी 11 ते 2 पर्यंत गुरुवर्य ह.भ.प.श्री. संतोष महाराज निंबाळकर भागवताचार्य, रामायणचार्य चांदूरबाजार यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत जयश्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सावनेर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सायंकाळी 6 वाजता देवाची महाआरती होईल. आरती नंतर लगेच सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रमाचे वितरण करण्यात येईल. या दरम्यान जय श्री दादाजी भजन मंडळ श्री.भगवंतराव मोरे सावनेर यांचा भजन संध्येचा कार्यक्रम राहील. तरी जास्तीत जास्त भाविकांनी आनंददायी धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती द्वारे करण्यात आलेले आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…