अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २३ ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ठाणे येथील बदलापूर गावातील शाळेमधील अवघ्या तीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर त्या शाळेतील अक्षय शिंदे या नराधमाने अनैतिक कृत्य केल्याची घटना समोर येतात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. अशाच प्रकारे सावनेर शहरात सुद्धा सर्व पक्षाच्या वतीने तसेच सावनेर शहरातील व लगत असलेल्या सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी या जनआक्रोश सभेत सहभाग होऊन पिढीत मुलींना न्याय देण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणात जन आक्रोश व्यक्त करुण अक्षय शिंदे या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी जमलेल्या सर्व समुदायांकडून करण्यात आली.
घडलेल्या घटनाबाबत पीडित पालकांनी शाळेत जाऊन याबाबत सांगितले असता त्यांचे मुख्याध्यापक व संस्थापक यांनी कोणीही ऐकले नाही. त्यांना अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवल्या गेले. नराधमाची हा हिस्टरी शिटर (दीर्घ काळापासून गुन्हेगारीत असणारा) असल्याचे पण माहित असून सुद्धा त्याला त्या शाळेत का बर ठेवण्यात आले अशा प्रकारचे अनेक प्रश्न यावेळी या सभेमध्ये बोलण्यात आले. वी वॉन्ट जस्टीस या निषेध सभेमध्ये जमलेल्या शालेय मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला इतकेच नव्हे तर रस्त्यावर येऊन जस्टीस चे नारे लावले तसेच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या असे यावेळी शालेय मुलींमार्फत बोलण्यात आले हे मात्र या सभेचे विशेष होते.
या सभेचे आयोजन सारस्वत सेंटर पब्लिक स्कूलचे सचिव प्राध्यापक विरखरे, व्यापारी संघाचे माजी सचिव मनोज बसवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पवन जयस्वाल, दीपक कटारे, राजेश खंगारे, पंचायत समिती सावनेरचे सभापती गोविंदा ठाकरे, कु्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र चिकले, पुर्व सभापती प्रकाश पराते, डॉ. योगेश पाटील, व्यापारी संघाचे दिनेश दमहे, पवन जामदार, निलेश पटे, राहुल बारई, आश्विन करोकार, आयएमए अध्यक्ष डॉ.विलास मानकर, डॉ. अमित बाहेती, डॉ.शिवम पुण्यानी, डॉ.अंकिता बाहेती, डॉ.विलास मानकर, डॉ.कु्ष्णराव भगत, डॉ. निलेश कुंभारे, डॉ.आशिष चांडक, डॉ स्मीता भूडे, आभिषेक गहरवार, आम आदमी पक्षाचे संजय टेंम्भेकर, डोमासाव सावजी, भाऊ गोतमारे, मुख्याध्यापिका भारती लोणकर, कमल बुरहान, सीमा गोतमारे, मुख्याध्यापक मार्क साखरपेकर व इतर शिक्षक वृंद यावेळी या सभेमध्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले यांनी केले तर आभार व्यापारी संघाचे पुर्व सचिव मनोज बसवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या यशस्वीते करीता अश्विन कारोकर, श्रीजय देशमुख, अजय महाजन, रुपेश कमाले, शफीक सैय्यद, राहुल धोंगडे आदिंनी परिश्रम घेतले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…