संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 23:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे रक्षाबंधन निमित्ताने राजुरा पोलीस स्टेशन येथे वृक्ष, कुंड्या भेट देण्यात आल्या. यावेळी निशा भुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सह पोलीस कर्मचारी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
रक्षाबंधन निमित्ताने राजुरा पोलीस स्टेशन येथे या कुंड्या व वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन राजुरा यांच्या मार्गदर्शनात आणी स्वतः परिश्रम घेऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन परिसरात विविध फुलझाडे तसेच वृक्षारोपण करीत असल्याची माहिती निशा भुते यांनी दिली. भविष्यात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सहकार्याने पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण व बगीचा निर्मिती याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.
यापूर्वी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राजुरा येथील तहसील कार्यालय व उप जिल्हा रुग्णालय येथे बगीचा तयार केला आहे. संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य, संघटक आपल्या वाढदिवस आणी इतरही स्मृतिदिनांची आठवण, स्मरण म्हणून स्वतः निधी संकलन करीत या सामाजिक व पर्यावरणीय, मानवता विकासाच्या कार्यात आपले कर्तव्य म्हणून हातभार लावत असतात हे विशेष .
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…