हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि. 23:- स्वर्गीय जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंती दिनानिमित्त कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. सुभाष हाल बल्लारपूर येथे जयंती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर तसेच औषधी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पेपर मिल मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी वसंत मांढरे, जनविकास सेनेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख, बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद उर्फ सिकी यादव आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्ष व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये उमेश कडू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे हेतू समजून सांगितला जनसामान्यांमध्ये आपल्या जन्मदात्यां विषयी आदरभाव व स्नेह सदा असावे त्यांच्या त्यागाची जाणीव आजीवन असावी या संकल्प भावनेला वाढवण्याकरिता अशा कार्यक्रमांचा उपयोग समाजामध्ये तरुण पिढीमध्ये प्रबोधनाच्या उपयोगी होऊ शकतो असा आशावाद व्यक्त केला नंतर सर्व मान्यवरांनी आयोजित कार्यक्रमाची स्तुती करीत स्वर्गीय जनार्दन कडू हे यांना विनम्र अभिवादन केले.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देव आणि त्यांच्या गृपचे डॉ. सुषमा लीडर, डॉ. देवाशिष राय, डॉ. नीलिमा अलगामकर व पॅथॉलॉजिस्ट विशाल पवार व सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच काही शहरातील सन्माननीय नागरिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा भाले, माजी महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मुरकुटे, रेखा पागडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वंगलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कडू मित्र परिवाराचे बल्लारपूर शहराचे ब्रँड अँबेसिडर मोहम्मद शरीफ सर, समशेर सिंह चव्हाण, नारद प्रसाद, प्रकाश तावडे, एमाजी कोठारकर, प्रियंकेश शिंगाडे, शंकरजी अडवाणी यांनी सहकार्य केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…