राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- जिल्हातील भिवंडी येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधातून एका पत्नीने आपल्याच पतीची गळा चिरुन हत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. बलराम मिश्रा असे हत्या करण्यात आलेला व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या बलराम उर्फ शेखर आणि त्याची पत्नी मूळचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिदिया गावातील रहिवासी आहेत. लग्नानंतर ते दोघे भिवंडीतील काल्हेर येथील रेती बंदर रोड येथील ओम साई अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर वास्तव्यात होते. आरोपी अनुभव पांडे हा देखील त्याच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. अनुभव पांडे आणि बलराम पांडे हे दोघेही उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. काही दिवसानंतर अनुभव पांडेचे बलराम यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपीने मृताच्या पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे 7 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या केली. त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला.
बलराम मिश्रा हा अचानक गायब झाल्याने त्याच्या भावाने नारपोली पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान चौकशी सुरु असताना पोलीसांना पत्नीवर संशय आल्याने तिला ताब्यात घेतले त्यानंतर तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीसांनी पत्नी राधा मिश्रा वय 25 वर्ष व अनुभव पांडे वय 23 वर्ष या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
बलरामचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कशेळी खाडी भागात शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…