आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. २५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सेलू तालुक्यातील पहेलानपूर गावातील असंख्य पुरुषांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २५ ऑगस्ट रोजी आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने रामाजी धनवटे, विजय मुडे, प्रमोद झाडे, लक्ष्मण झाडे, चंद्रभान पेरकुंडे, सुधाकर नरांजे, गणेश मसराम, प्रशांत देशमुख, राजू मुडे, नितीन झाडे, विजय जुमडे, अनिल जुमडे, दीपक शेळके, गुलाबराव गोळकार, वैभव देशमुख, अरुण मुडे, नितीन झाडे, संजू कांबळे, सुनील कुबडे, हिरामणजी गेडाम, रणजीत देशमुख, वासुदेव खऊट, किसणाजी पेरकुंडे, संजय ठेरे, सुरेशराव देशमुख, संजय वानखेडे गजनान नरांजे ईत्यादीसह अनेक पुरुष कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेंडे, माजी सरपंच शंकर धुर्वे, आलगाव येथील सरपंच गजानन शेळके, बाळासाहेब इंगोले, सरपंच योगेश गिरी, विजय जुमडे बुथ प्रमुख आलगाव, समाज सेवक प्रमोद झाडे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…