पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- आळंदी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अनुष्का सुहास केदार वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.
अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीला होत्या त्यांनी रविवारी सायंकाळी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांना पाण्यात उडी घेताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने देखील उडी घेतली.या घटनेची माहिती मिळतातच आळंदी नगरपरिषद आणि एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध घेतला असताना यांना अद्याप मृतदेह सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.
अनुष्का सुहास केदार या महिला पोलिसांनी वैयक्तिक कारणामुळे हे टोकाचे पाऊल घेतल्याचे सांगितले जात आहे. आळंदी पोलीस तपास करत असून मृतदेहाचा शोध लावला जात आहे. अद्याप मृतदेह सापडला नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…