प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- येथील शिक्षक कवी प्रकाश बनसोड यांनी रचलेल्या ‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो’ या गजल संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरोविण्यात आले. डोणगाव जि. बुलढाणा येथे झालेल्या मानवसेवा बहुउद्देशिय संस्था डोणगांव यांच्या वतीने दिला जाणारा राजाराम धोंडूजी खोडके राज्यस्तरीय स्मृती काव्य पुरस्कार प्रसिद्ध गझलकार डॉ .गणेश गायकवाड, चित्रकार श्रीधर अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पळसकर, प्राचार्य जीवन सिंह दिनोरे, जि.प. सदस्य राजेन्द्र पळसकर, कवी सुनिल खोडके, कवी लेखक रविन्द्र साळवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो’ या गझल संग्रहाची निवड संपूर्ण राज्यातून आलेल्या कविता संग्रहा मधून करण्यात आली. यावेळी गजलकार कवी प्रकाश बनसोड याना शाल, सुमने, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
गजलकार कवी प्रकाश बनसोड हे आपला शिक्षकी पेशा सांभाळून आपली साहित्य कला जोपासतात. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आर्वीचे ते मुख्य समन्वयक असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. या आधी त्यांच्या ‘माणूस’ व ‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो ‘ या काव्यसंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे प्रशांत ढोले, सुनिल खोडके, रत्ना मनवरे, सुरेश भिवगडे, विद्यानंद हाडके, चंदू गाडगे, संजय ओरके, भूषण रामटेके, प्रकाश जिंदे, पद्माकर अंबादे, इत्यादी साहित्यिक व शिक्षक मित्रांनी अभिनंदन केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…