विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे, ’जर कुंपणच शेत खात असेल, तर दाद मागायची तरी कुणाकडे?’ असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. एरव्ही सामान्य गरीब जनतेवर कायद्याचा बडगा उगारणारे प्रशासन धन दांडग्या सोबत संगनमत करून तालुक्यातील गौणसंपदेचा ऱ्हास करीत आपले अर्थकारण पूर्ण करण्यात धन्यता मानत असल्याची जोरदार चर्चा सध्या एटापल्ली तालुक्यात सुरू आहे. याचेच एक उदाहरण गेल्या चार दिवसापूर्वी म्हणजे रविवारी (दि.18) रोजी समोर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथिल महसूल भवनात नालीचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाकरिता कंत्राटदारानी रविवारच्या रात्रौ 11 वाजताच्या दरम्यान रेतीची वाहतूक करून महसूल भवनात साठवून ठेवली त्यासंदर्भात जारावंडी साजाचे मंडळ अधिकारी यांना विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिला परंतु सलग आजघडीला एक आठवड्याचा कालावधी लोटून सुद्धा त्या कंत्रातदारावर कोणतीच कारवाही झालेली नाही. या संदर्भात जारावंडी साजाचे तलाठी याना विचारणा केली असता कंत्राटदार कोण याचा शोध घेणे सुरू आहे अशी माहिती दिली परंतु घटनास्थळी प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे अजून पर्यंत कोणतीच कारवाही न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
अशात गेल्या काही दिवसांपूर्वी जारावंडी येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन टॅक्टर जप्त करून त्याच महसूल भवनात ठेवले आहेत त्या टॅक्टरच्या सुरक्षेकरिता भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्या गेला आहे परंतु रविवारच्या रात्रौ रेती वाहतूक केली गेली तेव्हा त्या कंत्राटदाराला कोण द्वार खोलून दिला आणि कंत्राटदारानी कसं काय रात्रोच्या वेळी रेती साठवणूक करून ठेवली असा प्रश्न आता जण सामान्यांना उपस्थित होत आहे.
जनसामान्यांना कायद्याचा बळगा उभारून कारवाही करणारे अधिकारी आणि साध्या बैल बंडीना सुद्धा वेडीच धरणारे अधिकारी आता त्यांच्याच घरात चोरी होत असताना हाताची घडी तोंडावर बोट कसे काय असा असा प्रश्न निर्माण होत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…