राजकिरण नाईक, कुही तालुका प्रतिनिधी
कुही:- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही, जि. नागपूर, येथे दिक्षांत समारंभ शनिवार दि.17 सप्टेंबर 2022 ला संपन्न झाला. अश्या प्रकारचा दिक्षांत समारंभ प्रथमच औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म.रा.मुंबई द्वारा प्रत्येक संस्थेला अनिवार्य करून देशामध्ये एकाचं दिवशी विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. या दिक्षांत समारंभाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून मा.शरद कांबळे सर, तहसीलदार कुही होते, अतिथी मा.विनय रामटेके,व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा कुही, मा.हारगुडे साहेब,नायब तहसीलदार कुही तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.ठवकर सर, मुख्याध्यापक, रुकडाश्रम ज्यू कॉलेज कुही उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक ने उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर सूर सर वरिष्ठ निदेशक यांनी केले व दिक्षांत समारंभाचा उद्देश सांगितला की प्रशिक्षणार्थी यांच्या कौश्यल्य गुणाचा सम्मान व्हावा ज्या प्रमाणे भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयआयटी) नी नाव लौकीक केले त्याच प्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा(ITI) प्रशिक्षणार्थी कौशल्य पणाला लाऊन देशाच्या तांत्रिक विकासा मध्ये मोलाचे योगदान करतो. त्यामुळे त्याचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे .याचं हेतूने कौशल्य दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.शरद कांबळे साहेब तहसीलदार विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की जे आपण प्रशिक्षण घेतले आहे त्यामध्ये कौशल्य निर्माण करून आयुष्यात यशस्वी होऊ होऊ शकता तसेच देशाच्या विकासात हातभार लावू शकत असल्याने आपले योगदान फार महत्त्वाचे आहे म्हणून असे दीक्षांत समारंभ मधून कौतुक होणे आवश्यक असते असे प्रतिपादन केले.
हारगुडे नायब तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्य करिता शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्राचार्य चंद्रशेखर राऊत म्हणाले प्रथमच देशामध्ये अश्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांचे कौशल्याचे कौतुक करताना आनंद होत आहे. आपण आपल्या आयुष्यात आलेल्या संधीचा लाभ घ्यावा व पुढील आयुष्यात श्रमाला कमी न लेखता प्रथम मिळेल ते काम स्विकारण्याची तयारी ज्यांची असेल तो जीवनात यशस्वी झाल्या शिवाय राहत नाही असे प्रतिपादन करून प्रशिक्षनार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील आयुष्या करिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष ठवकर सर मुख्याध्यापक म्हणाले की ज्या विद्यार्थ्यां मध्ये जिद्द असेल आणि कौशल्य असेल तो आयुष्यात कधीही मागे राहत नाही त्यामुळे अश्या कौशल्य असलेल्या गुणांचे कौतुक होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करून अभिनंदन केले व पुढील आयुष्य करिता शुभेच्छा दिल्या.तसेच मा.प्रमोद डाखोळे पूर्ण वेळ शिक्षक ,एम.सी. व्ही.सी. रुकडाश्रम ज्यू.कॉलेज कुही हे सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन सौ निशा किनेकर निदेशिका यांनी केले तर आभार श्रीधर घाटोळे निदेशक यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व निदेशक श्रीमती कीर्ती विंचूरकर ,सौ प्रणिता सूर, कु.छाया मेश्राम, आशिक मेश्राम, भांडारपाल नितीन वानखेडे,वरिष्ठ लिपिक अतुल वालदे,च.श्रे. क.मुनेश्वर वंजारी, देविसिंह बाडवाईक, कमलेश नागपुरे तथा प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…