मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार चीत.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- नुकतेच एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या आहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तत्कालीन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते, काँग्रेस नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र, अवघ्या काही कालावधीतच त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावरच अविश्वास ठराव पारित करण्यात आला असून कायापालट होणार हे निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांचा या परिसरात असलेला सहकार क्षेत्रातील दबदबा कमी झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेला वजनही कमी झाला आहे. यामुळे अजय कंकडालवार यांना खूप मोठा झटका बसला आहे.
एप्रिल २०२३ मध्ये अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली होती. १८ सदस्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अजय कंकडालवार यांनी स्वतः दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी १० विरुद्ध ७ अशी एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती. दरम्यान त्यांनी एका ठिकाणी राजीनामा दिला होता. आता येथे १७ सदस्य संख्या होती. सत्ता स्थापन करते वेळेस १० विरुद्ध ७ अशी स्थिती होती. मात्र, अवघ्या काही कालावधीतच त्यांच्या सभापती पदावर नाराज असलेल्या सदस्यांनी अविश्वास ठराव पारित करत आता १२ विरुद्ध ५ अशी स्थिती निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे अजय कंकडालवार गटाकडून निवडून आलेले रवींद्रबाबा आत्राम (उपसभापती), राकेश कुळमेथे, अनिल कर्मकार, मलुबाई ईश्टाम, सैनु आत्राम या सदस्यांनी त्यांना नाकारले असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या गटात सामील झाले आहे. यामुळे एकंदरीत काँग्रेसचे नेते तथा माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली आहे.
विशेष म्हणजे अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजय कंकडालवार यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने नाराज सदस्यांनी त्यांचाच गेम केला, अशी चर्चा अहेरी राजनगरीत सुरू आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…