पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्यास 235 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही.
सन 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून लाकडी बैल (तान्हा) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैला प्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकी चे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या प्रथेला 235 वर्षे पूर्ण होत आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे.
राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. मुधोजीराजे चे निवासस्थान सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 235 वर्षानंतर आजही सुद्धा ही प्रथा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी नियमीत सुरू ठेवली व यापुढेही सुद्धा ही प्रथा चालू राहील असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…