अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री.क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. या उर्स मध्ये असंख्य भाविक बाबांच्या दर्शनाकरिता येतात. राष्ट्रीय एकता व अखंडता याचे प्रतीक श्री. बाबा ताजुद्दीन औलिया यांनी आपल्या जीवनातील १२ वर्षाच्या जीवनकाळ वाकी येथे घालविला त्यांच्या चरण स्पर्शाने वाकी नगरी पावन झालेली आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री.क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स याही वर्षी ३ सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता प.पू.श्री.काशिनाथ नाना डाहाके पाटील यांच्या वाकी गावातील निवासस्थानातून (वाडा) संदल निघेल व तो वाकी गावाला गस्त करून सायंकाळी 6.00 वाजता वाकी दरबार येथे पोहोचेल. परंपरेनुसार सज्जादा नशीन श्री. ज्ञानेश्वर डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन होईल. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबांना चादर चढवण्यात येऊन उर्सला प्रारंभ होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री 8.00 वाजता मिलाद व 9.00 वाजता कव्वालीचा कार्यक्रम होईल.
4 सप्टेंबरला सकाळी 10.00 वाजता कुल शरीफ चा कार्यक्रम होऊन उर्सची समाप्ती होईल. या उर्स कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घ्यावा. असे आव्हान श्री.बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन श्री. प्रभाकरराव डाहाके पाटील यांनी केले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…