प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा
मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी आखली
सदरची जबाबदारी वर्धा सायबर यांना देण्यात आली होती.
त्यावरुन वर्धा सायबर पथकाने दैनंदिन कामकाज सांभाळुन हरविलेल्या मोबाईलचे शोध घेण्याचे आदेश प्राप्त होताच मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु केले. चालु वर्षात एकुण ५६८ मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी प्राप्त असुन सदर शोध मोहिमे दरम्यान वर्धा जिल्ह्यातुन, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन तसेच बाहेरील राज्यातुन असे एकुण 222 मोबाईल किमत 33,29,500 रुपये हस्तगत करण्यात आले. दिनांक 29 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशाप्रमाणे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे त्यांचे मुळ मालकांना परत करण्याकरीता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला असुन सदर कार्यक्रमाकरीता 134 नागरीक उपस्थित झाल्याने नागरीकांचे तक्रारीची खात्री करुन त्यांना त्यांचे मोबाईल सुपुर्त करण्यात आले. तसेच उर्वरीत मोबाईल त्यांचे मुळ मालकांना सायबर सेल, वर्धा येथुन सुपुर्त करण्यात येत आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अनुराग जैन (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कावडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण (भा.पो.से.), प्रमोद मकेश्वर, देवराव खंडेराव, रोशन पंडीत यांचे निर्देशाप्रमाणे पो.नि. विनोद चौधरी स्था.गु.शा. वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सायबर सेल वर्धा येथील पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, मिना कौरथी, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे, यांनी केली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…