उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्या वरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ तथागत ग्रुप आक्रमक झाली असून या प्रकरणी चौकशी करून जे गुन्हेगार असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून मेहकर येथील तहसील कार्यालय येथे नायब तहसीदार पिंपरकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवी मिस्किन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहकर तालुक्याचे जेष्ठ नेते आफ्ताबजी खान यांच्या नेतृत्वाखाली मेहकर येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने तीव्र जाहीर निषेध व्यक्य करत आहे. यामध्ये ज्या – ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनीयर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची सखोल चौकशी करावी. या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण यामध्ये सामील आहेत. त्यांची ही सखोल चौकशी झाली पाहिजे.
हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाईगडबडीने राजकारणाच्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे भ्रष्टाचारी शाळा, महाविद्यालय, हॉस्पीटल, रस्ते, उड्डाणपूल, या कामात ही भ्रष्टाचार करतात परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणे सोडले नाही किती दुर्दैव आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात त्याच शिवाजी राजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळणं म्हणजे हा महाराष्ट्र कोसळला आहे. पावणे चारशे वर्षांपासून छत्रपतींनी निर्माण केलेला एकही किल्ला कोसळला नाही छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला तो सुद्धा १२६ वर्षे झाले तरी सुद्धा धक्का नाही मग हा पुतळा आठ महिन्यात कसा काय कोसळला. यामध्ये कोण कोणते मंत्री, खासदार,आमदार, अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने करण्यात येत आहे.
यावेळी, तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, आफ्ताबजी खान, रवी मिस्कीन, कुणाल माने, दुर्गादास अंभोरे, राधेशाम खरात, अख्तर कुरेशी, प्रकाश सुखधाने, राम डोंगरदिवे, आरिफ शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…