नाशिक: बिबट्याची कातडी, चिंकाराचे आणि निलगायीचे शिंगे तस्करी प्रकरणी तीन जणांना अटक, त्यात दोन विद्धार्थी.

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील पूर्ण करू शकत नाही मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन सविद्यार्थीना वन विभागाने अटक केली आहे.

नाशिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे बिबट्याची कातडी, चिंकाराचे आणि निलगायीचे शिंगे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी वन विभागाला मिळाली होती. वनविभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून संशयितांशी संपर्क साधला. सुरवातीला वन्यप्राण्यांच्या अवयवांची किमत २० लाख रुपये सांगण्यात आले होते. मात्र तडजोड करत ४ लाख रुपये देण्याचे ठरले.

मंगळवारी २० सप्टेंबर शहरातील उच्चभ्रू समाजल्या जाणाऱ्या कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ तीन संशयित आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांसह रंगेहात अटक केली आहे. संशयित आरोपींची चौकशी केली असता ते नाशिकमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याच उघड झाल आहे. तीन साथीदार असल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.

वन विभागाने अटक केलेले तीनही संशयित नाशिक शहरातील आहेत. यातील दोन युवक महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एक तरुण बी. फार्मसी, तर दुसरा बी. एस. सी. करत आहे. तर तिसऱ्या युवक नाशिक शहरात खाजगी व्यवसाय आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात सुद्धा कारवाई करण्यात आली होती. यातही बिबट्याच्या कातडी मिळून आली होती. ग्रामीण भागातील वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी आता शहरातही सक्रीय होत असल्याच या घटनेमुळे समोर आल आहे.

नाशिक जिल्हायात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच राजापूर भागात हरीण काळवीट अभयारण्यात संख्या अधिकच झाली आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यात वन्य जीवांची आणि त्यांच्या अवयव विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक घटनांत समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या बाजारात अशा वस्तुंना मागणी वाढल्याने नाशिक मधील काही प्रतिष्टीत यामागे असल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

13 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago