मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पस्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात 41 कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “जीवनाची संध्याकाळ ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत. ते नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. आजवर त्यांनी 100 च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पस्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले, प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे,पुनाजी कोटरंगे, रविंद्र गेडाम, संगीता ठलाल, पी. डी. काटकर, प्रेमिला अलोने, लता शेंद्रे, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, वसंत चापले, सुरज गोरंतवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, नरेंद्र गुंडेली, राजरत्न पेटकर, भिमानंद मेश्राम, मुरलीधर खोटेले, उकंडराव नारायण राऊत, वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर, रेखा दिक्षित, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, हरिष नैताम, उत्तम प्र. गेडाम, मिलींद बी. खोब्रागडे, गजानन गेडाम, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम, विलास जेंगठे, मधुकर दुफारे, सुरेश गेडाम, केवळराम बगमारे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता. या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…