विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- काल दिनांक ०६ सप्टेंबर रोजी शुक्रवारला आलापल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही मोजके पदाधिकारी यांनी लालसापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. असे अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, दिनांक ०५ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख व मनीष दुर्गे यांनी पदाचा राजीनामा दिला. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेल आहे. रियाज शेख यांचे खूप तक्रारी सुद्धा गेलेल्या होत्या आणि येणारा काही दिवसांमध्ये त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी सुद्धा करणार होते परंतु याची चाहूल त्यांना लागलेली होती त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. विलास सिडाम नगरसेवक नगरपंचायत अहेरी व रियाज शेख यांची कन्या कुमारी नवरास रियाज शेख यांनी अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता परंतु त्यांना पुन्हा एकदा प्रवेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे रियाज शेख यांच्याबरोबर गेलेले हे पक्षातले नसून त्यांच्याच परिवारातील लोक आहेत. बाकी सर्व पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक अजूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक आहेत.
आजच्या या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात आलेले आहे आणि त्यात माझे सुद्धा नाव त्या ठिकाणी घेण्यात आले. रियाज शेख जिल्हाप्रमुख असताना त्यांच्याकडे विधानसभेची यादी होती त्यांनी तीच यादी त्या कार्यक्रमात जाहीर केली. मी आणि बाकी इतर अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कोणीही पक्षप्रवेश केलेला नाही. आमच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून हेतू परस्पर बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या लोकांनी केलेला आहे.
अहेरी विधानसभेतील इतर कोणतेही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्याबरोबर गेलेले नाही याची विद्यमान आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य धर्मराव बाबा आत्राम आणि स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दखल घ्यावी व त्याची शहानिशा करावी. हा आमचा अपमान आहे, अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन दुखावलेले आहे. मी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कडवट सच्चा शिवसैनिक आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मी आजही, उद्याही उद्धव यांच्या सोबत आहे. मी प्रामाणिक होतो आजही आहे आणि सदैव राहणार. अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहेत व हा आमचा अपमान आहे. चुकीचा मेसेज पोहोचवण्याचा कट कारस्थान ह्या लोकांनी केलेला आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी याचा खंडन करतो तसेच जाहीर निषेध करतो.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…