आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बीएसएफचे सेवानिवृत्त सैनिक आणि हिंगणघाट शहराचे शूर सुपुत्र दिनेश बापूरावजी नरड यांचे १० सप्टेंबर रोजी आगमन झाले. त्यांनी 21 वर्षे सीमा सुरक्षा दलात अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य बजावले. आपल्या सेवेदरम्यान, त्यांनी भारत-पाकिस्तान, भारत – बांगलादेश यांसारख्या भारताच्या विविध सीमा आणि आसाम, मेघालय, त्रिपुरा यांसारख्या ईशान्येकडील दुर्गम भाग आणि जम्मू-काश्मीर, काश्मीर, पंजाब, राजस्थान या अत्यंत दुर्गम भागांमध्ये आपले कर्तव्य नि:स्वार्थपणे पार पाडले. त्यांच्या आगमनानिमित्त पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट तालुका तर्फे हिंगणघाट शहरातील रेल्वे स्टेशन येथून भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी या रॅलीमध्ये पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट तालुका चे अध्यक्ष विलास भोयर, कोषाध्यक्ष सागर दाते, सचिव राजु साटोणे, संपर्क प्रमुख अमोल पवार आणि नितेश लाचरवार, पांडुरंग दानविज, सतीश दुधे, अशोक खोडे, मधुकर उईके, सुनील निमजे, योगेश मसराम, गणपत वानखेडे, महेश गंधारे उपस्थित होते. तसेच शहरातील समाजसेवी संस्था, माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक बकाणे व त्यांचे सदस्य, रुग्ण मित्र फाउंडेशनचे गजुभाऊ कुबडे व त्यांचे सहकारी, वृक्षमित्र परिवार चे नितीन क्षीरसागर आणि सदस्य, संत ज्ञानेश्वर वॉर्डच्या माजी नगरसेविका धनश्री वरघणे, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल शाखा हिंगणघाटचे संतोष पन्नासे तथा संत ज्ञानेश्वर वार्ड मित्र परिवारच्या वतीने अतुल जाधव, सूरज कुबडे, प्रशांत लोणकर, अजय ठाकरे, पंकज बढिये, प्रवीण दरवेकर, रोशन नगमोते, वैभव बाबर, भूषण डाखोरे, मोहन तुमराम, सचिन इटनकर, भूषण चंदनखेडे, सूरज भोपळे, उमेश निनावे, विठलरावं तळवेकर, पटवारी कॉलनीचे सर्व आजी/ माजी पटवारी सदस्यानी स्वागतमूर्ती दिनेश नरड यांचे स्वागत केले. यावेळी या रॅलीत हिंगणघाट शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीला संत तुकडोजी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये हिंगणघाट येथून रजेवर आलेले पॅरामिलिटरी मित्र परिवार, सेवानिवृत्त व सेवानिवृत्त सैनिक, माजी कल्याणकारी ट्रस्ट, हिंगणघाटचे माजी सैनिक यांनी अमर ज्योती स्मारकावर अमर ज्योती प्रज्वलित करून व पुष्पचक्र अर्पण करून अमर सैनिकांना आदरांजली वाहिली. अमर सैनिकांच्या स्मृती आणि राष्ट्रगीत गायले. यानंतर हिंगणघाट येथील पॅरामिलिटरी मित्र परिवाराच्या वतीने नगरच्या शूर सुपुत्राचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन सुनील निमजे यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…