दिनांक २१/०९/२०२२
पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २०/०९/२०२२ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलीकडुन वेश्याव्यवसाय करुन घेणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २०/०९/२०१२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अमलदार यांना भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ऑफिस नंबर बी-५ बी विंग, पहिला मजला, प्रिव्हिया बिझनेस
सेंन्टर, आरटीओ ऑफिसजवळ, सेक्टर नंबर ६, मोशी प्राधिकरण, पुणे येथील CROWN नावाचे स्पा सेंटरमध्ये
स्वतःचे आर्थिक फायदयासाठी मुलींकडुन पेश्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात आहे अशी
माहिती मिळाली होती अशा मिळालेल्या माहितीवरुन बनावट ग्राहक पाचारण करून पडताळणी करीता वर नमुद
ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुन महिला आरोपीचे ताब्यातून एकुण ०४ पिडीत मुलींची त्यामध्ये नेपाळ १.
झारखंड १. महाराष्ट्र २ अशा पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुखरुप सुटका करण्यात आलेली आहे.घटनास्थळावरुन जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) ४००० /- रोख रक्कम
२) १२०/- रु. किं. चे इतर साहित्य.
३) ४.०००/- रु. किं.चा एक एम आय कंपनीचा मोबाईल हँडसेट जु.वा. किं.अं. ४)
००,००/- रु. किं.चे 1 PHONE PAY स्कॅनर, 1 paytm स्कैनर जु. वा. कि. अं..एकुण ८,१२० /- रु. किं. चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन महिला आरोपी नामे १) खतीजा मोजीव खान वय २५ वर्षे रा. रुम नंबर ५. निलेश लांडगे यांची बिल्डींग, भारतीय स्टेट बँकचे मागील बाजुस, भोसरी आळंदी रोड, मोसरी पुणे मो.नं. ८४२१६१३१७४ (स्पा मॅनेजर) पाहिजे आरोपी नामे २) अजय अरुण वाळके वय ३२ वर्षे रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी पुणे मोबा नं९८२२८०६९२७ (स्पा चालक मालक) यांचे विरुध्द मोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं ५७४/२०२२ भा.व. वि. कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो. मा. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे,सो, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे सारे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके, पोउपनि (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस अमलदार सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव मपोशि झावरे यांनी केली आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे झालेल्या बैठकीत…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 'वाचन ही ज्ञानभांडाराची गुरुकिल्ली…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लीपुर येथे मकर…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 13 जाने:- महान तत्वज्ञ…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- राजमाता मॉ जिजाऊ व…
आरिफखांन हबीबखांन पठान यांची पत्रकार परिषदेत लावला अंजूमन हामी ए इस्लाम संस्थेवर गंभीर आरोप. पल्लवी…